महत्वाच्या बातम्या

 समान संधी दिल्यास दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील


- गंगाधर जिभकाटे जि.प.अध्यक्ष यांचे प्रतिपादन

- जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारतीय संविधानानुसार सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांपासून वेगळे ठेवून भेदभाव केला जातो, यामुळे दिव्यांग मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. सर्वसामान्य मुले व दिव्यांग मुले एकत्र शिकल्याने दोन्ही मुलांना सहकार्य, सामंजस्य हे गुण आत्मसात करता येतील. दिव्यांग मुलांना सहानुभूती देण्यापेक्षा ते समाजाचाच एक भाग आहेत, त्यामुळे दिव्यांगना समान संधी दिल्याने ही मुले स्वावलंबी बनतील व त्यांच्यातील न्यूनगंड दूर होतील व दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद भंडारा चे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी केले .ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांचे अधिनस्त विशेष मुलांसाठी कार्यरत शासकीय, अनुदानित व विना अनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळातील मुलांमुलींच्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, समाज कल्याण समिती सभापती मदन रामटेके, बाल कल्याण समिती सभापती स्वाती वाघाये, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.जी. बोंद्रे, प्रो. कबड्डी खेळाडू आकाश पिकलमुंडे, समाज कल्याण समिती सदस्य  रजनिश बन्सोड, विद्या कुंभरे, समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे, सलेय दिवाकर रोकडे, शिवराम बाराई, विनोद उमप, संस्थापक सुदेश डुंभरे, एकनाथ गाढवे, संजय घोळके, आर एस वाघाडे, प्रीती पडोळे, ममता बांगरे, सुरेश घडले, शरदचंद्र बरसागडे, गणेश महेर, विनायक पाथोडे, प्रमोद सोनकुसरे, रामनारायण केजरीवाल, माया चोपकर, नलू वैद्य, नितीन मोहतुरे, निलेश गाढवे आदी  मंचकावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत समाज अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी शासनामार्फत समाज कल्याण विभागात दिव्यांग बांधवा करीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. दरम्यान अंधाचे दैवत लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या तेलचीत्राचे पूजन करण्यात आले. पुढे बोलतांना दिव्यांगणा सन्मान दिला पाहिजे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी केले. दरम्यान दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर सहारे तर उपस्थितांचे आभार संजय माळवी यांनी मानले.






  Print






News - Bhandara




Related Photos