केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा : इंजि. प्रमोद पिपरे
- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत गडचिरोली विसापूर येथे भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविले जात आहे. देशाचे प्रधानमंत्री, नरेंद्र मोदी यांच्या नेत्रुत्वातील भारत सरकारने महिलांना लोकसभा, विधानसभेत प्रतीनीधित्व देणारा निर्णय, मुस्लिम महिलांना त्रिपल तलाक पासुन सुटका देणारा निर्णय, सैनीक शाळेत मुलीना प्रवेश, १० करोड गरीब महिलांना मोफत गँस, घरकुल, शौचालय, किसान सन्मान योजनेचा लाभ, २४ कोटी गरीब महिलांचे मोफत जनधन बँक खाते, असे अनेक महिलांच्या विकासा करीता निर्णय घेउन भारतातील मात्रुशक्तींचा सन्मान केला आहे. या सर्व कल्याणकारी योजनेचा शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकसभा समनव्ययक इंजि. प्रमोद पिपरे यांनी केले.
नगरपरिषद गडचिरोली यांच्या वतीने विसापूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत वाघरे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भूरसे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, शिवसेना महिला संपर्कप्रमुख हर्षा मोरे, नप मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, नप उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवर, माजी उपनगराध्यक्ष नक्टुजी पेटकर, भाजपा तालुका अध्यक्ष विलास पाटील भांडेकर, लता पुंगाटे, माजी न.प. सभापती केशवजी निंबोड, शामजी वाडई, माजी नगरसेवक अविनाश वरघंटिवार, मुनघाटे, डॉ. गेडाम तसेच मोठया संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध योजनांचे स्टॉल लावलेले होते. १ हजार ४१२ महिला उपस्थित होत्या. सदर महिलांना विविध योजना अंतर्गत ५ हजार ७५८ लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धा, समूह नृत्य, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन संध्या चिलमवार तर आभार गणेश ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच नपशाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli