माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पुंडलिक भांडेकर यांचा सत्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथील नाट्यलेखक तथा पत्रकार पुंडलिक भांडेकर यांनी नाट्यलेखन, कलावंत, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कुनघाडा रै यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात माजी मंत्री तथा चिमूर क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व शिवरायांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार होते. तर अध्यक्षस्थानी आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे होते .
प्रमुख अतिथी म्हणून महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव चंदा कोडवते, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी सरपंच अविनाश चलाख, माजी जिल्हा परिषदचे सदस्य पितांबर वासेकर, सरपंच अल्का धोडरे, जिल्हा काँग्रेसचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, ओबीसी सेलचे काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, माजी सरपंच अशोक वासेकर, नवरगावचे सरपंच खुशाल कुकडे, ग्राम पंचायत सदस्य वैभव दुधबळे, ग्राम पंचायत सदस्य विनोद दुधबळे, ग्राम पंचायत सदस्या दीपाली घोंगडे, ग्राम पंचायत सदस्य दिलीप दुधे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी शृंगारपवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वडेट्टीवार, खुशाल वासेकर, मंगेश वासेकर, रमेश कोठारे आदी उपस्थित होते.
नाटककार तथा पत्रकार पुंडलिक भांडेकर यांना २००२ मध्ये मुख्य वनसंरक्षक पवार व युवा स्पंदनचे प्रबंध संयोजक अनिल दांडेकर, श्याम पेटकर यांच्या हस्ते लेखामेंढा येथे तरुण भारत युवा स्पंदन पुरस्कार, २००३ मध्ये जिल्हाधिकारी अ.द. काळे यांच्या हस्ते आरमोरी येथे नाट्यश्री पुरस्कार, २००५ मध्ये गडचिरोली येथे शिवसाधना पुरस्कार, २०११ मध्ये मा सा कन्नमवार सभागृह चंद्रपूर येथे राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार, २०१८- १९ मुक्तीपथचे संस्थापक डॉ. अभय बंग व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते प्रेस क्लब गडचिरोली येथे जिल्हा सर्वोत्कृष्ट वार्तांकन विशेष पुरस्कार व सर्वाधिक वार्तांकन चामोर्शी तालुका प्रथम मुक्तीपथ माध्यम पुरस्कार अशा आदी पुरस्काराचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन मंगेश वासेकर यांनी केले, प्रास्ताविक अनिल कोठारे तर आभार रमेश कोठारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश वासेकर,रमेश कोठारे, पियुष गव्हारे, अक्षय सुरजागडे, साहिल कस्तुरे, ताराचंद भांडेकर, साहिल वडेट्टीवार, पंकज खोबे, प्रीतम सुरजागडे, हर्षद भांडेकर आदींनी परिश्रम घेतले.
News - Gadchiroli