ब्रह्मपुरी : अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई : ट्रॅक्टर चालक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / ब्रह्मपुरी : तालुक्यातील सावलगाव येथील वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वैनगंगा नदीकाठावर तातडीची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत मयूर प्रकाश तलमले (२३, रा. सावलगाव) हा ट्रॅक्टर चालक आढळून आला. त्याच्या ट्रॅक्टरमध्ये अंदाजे १ ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टर आणि रेती असा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




