महत्वाच्या बातम्या

 आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ग्रामीण भागातील विविध विकासकामांचे भुमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दरम्यान त्यांच्या हस्ते ग्रामीण भागातील पडोली, छोटा नागपूर आणि दाताळा येथील एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार यंग चांदा ब्रिगेडचे गुड्डू सिंग, मुन्ना जोगी, दाताळा सरपंच सुनीता देशकर, उपसरपंच विजयालक्ष्मी नायर, ग्रामपंचायत सदस्य बंडू मत्ते, मधुकर हीवरकर, अनीमा घागरगुंडे, छाया डांगे, माजी सरपंच रवींद्र लोनगाडगे, माजी सदस्य मंदा काळे, वर्षा मुंगुले, पिंकी घागरगुंडे, करण नायर, नितेश शेंडे, मयूर मदनकर, देवेंद्र देशकर, भूषण अंबादे, रामदास चिडे, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाढई, सरिता पिंपळकर, महादेव पाटील पिंपळकर, देविदासपाटील पिंपळकर, समीर रामटेके, रोहित झाडे, कर्मवीर वैद्य, विदेश रामटेके, महेश वाढई, राहुल गणफाडे, प्रतीक झाडे, शुभम झाडे, पडोलीच्या उपसरपंच सुनिता नागरकर, सदस्य निशीकांत पिसे, तोसिफ पठाण, बौधदास चांदेकर, सुभाष आवळे, शबाना शेख, शामलता इटकलवार, सुनिता पिंपळकर, संगिता आळे, छाया उईके, छाया पायघन, किशोर आवळे, परशुराम वाढई, आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने मतदार संघातील विकाससासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. सदर निधीतुन शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलभुत सोई - सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. मतदार संघातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावाचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहे. त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतुन अनेक कामे पुर्ण झाली आहे. तर काही कामे प्रगतीपथावर आहे.

दरम्यान शासनाच्या 25/15 निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतील ५० लक्ष रुपयातून पडोली येथील पाच सिमेंट काॅंक्रिट रोडचे बांधकाम केल्या जाणार आहे. तर ३० लक्ष रुपये खर्च करुन छोटा नागपूर येथे व्यायम शाळा बांधण्यात येणार आहे. तसेच यातील 20 लक्ष रुपये दाताळा येथील दोन सिमेंट काॅंक्रीट रोडच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. सदर सर्व कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधिवतरित्या भुमिपूजन करण्यात आले आहे.

आजवर शहरी भागाच्या विकासाकडे अधिक भर देण्यात आला. त्यामूळे ग्रामिण भागातील अनेक महत्वाची कामे प्रलंबित राहिली. मात्र आपण मला आमदार म्हणुन निवडूण दिल्या नंतर शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासाकडेही आपण विशेष लक्ष दिले. मोठा निधी आपण ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी खर्च केला. पडोली, दाताडा आणि छोटा नागपूर येथील गावक-र्यांनी काही कामे सुचविली होती. त्या कामांना आपण प्राधाण्य देत त्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला आहे. आज त्या निधीतुन हे सर्व कामे पुर्ण होणार आहे. आपण केलेली मागणी पूर्ण करता आली याचा नक्कीच आनंद आहे. मात्र यावर न थांबता आपले गाव सर्व सोयी सुविधायुक्त कसे बनेल यासाठी नियोजन करा त्या कामांसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करुन देऊ असे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 





  Print






News - Chandrapur




Related Photos