महत्वाच्या बातम्या

 नाशिकच्या कंपनीत भीषण स्फोट : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक : नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यात मुंढे गावात असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कपंनीत मोठा स्फोट झाला. अजूनही इथली आग अनियंत्रित आहे. या स्फोटात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. १७ जखमी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. इगतपुरी स्फोटात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. स्फोटाची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी सिल्लोडमधली सभा रद्द केली आणि ते नाशिकमध्ये पोहोचले. आणि त्यांनी जखमींची विचारपूस केली, तसंच स्फोटाची माहिती घेतली. नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यात मुंढे गावात असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. अजूनही इथली आग अनियंत्रित आहे. या स्फोटात दोघा महिलांचा मृत्यू झाला. महिमा आणि अंजली अशी त्यांची नावं आहेत. तर या स्फोटात १७ जण जखमी आहेत. त्यांच्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. भारती पवार यांनी ही माहिती दिली. या कंपनीतील बॉयलर फुटल्याची चर्चा परिसरात आहे. तर केमिकल टँकर्सचा स्फोट झाल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या २० ते २५ गावांमध्ये त्याचे हादरे जाणवले. स्फोटनंतर कंपनीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली. आजूबाजूच्या २० ते २५ गावांमध्ये स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते. कंपनीच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार झाल्याचे दिसून आहे. स्फोटानंतर तात्काळ अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग पसरल्याने ती विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या कंपनीत एकूण १५००० कर्मचारी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पॉलिफिल्म ही आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी आहे.





  Print






News - Rajy




Related Photos