महत्वाच्या बातम्या

 सरखेडा येथे १० लाखांच्या निधीतून उभारले जाणार समाज मंदिर


- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील सरखेडा येथे समाज मंदिर बांधकाम केले जाणार असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सरखेडा येथील आदिवासी बांधवांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आदिवासी बांधवांची अडचण लक्षात घेता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विशेष अनुदान योजने अंतर्गत तब्बल १० लाखांची निधी मंजूर करून दिली. या ठिकाणी भव्य असा समाज मंदिर उभारले जाणार असून नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेला शब्द पाळल्याने गावकऱ्यांनी आभार मानले.

समाज मंदिर भूमिपूजन प्रसंगी सरखेडाचे सरपंच वर्षा उसेंडी, उपसरपंच रमेश दुग्गा, विजू मडावी, सैनु उसेंडी, भूमिया अशोक उसेंडी, मणिराम उसेंडी, संगीता येरणे, रुक्मा उसेंडी, गुरुदास टिंगूसले, संपत येरणे, महादू उसेंडी, सोमाजी गणुजी उसेंडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, येमलीचे सरपंच ललिता मडावी, जारावंडीचे सरपंच सपना कोडापे, नगरसेवक जितेंद्र टिकले, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, नगरसेविका निर्मला हिचामी, सरिता हिचामी, माजी नगरसेविका सगुणा हिचामी आदी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos