महत्वाच्या बातम्या

 ठाणेगाव येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवसीय भव्य यात्रा                                   


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : ठाणेगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा शिवरात्री निमित्त ८ व ९ मार्च २०२४ ला पौराणिक हेमांडपंथी शिवमंदिर येथे हेमांडपंथी शिवलिंग ‌‌देवस्थान यात्रा समिती व ठाणेगाववासीयांच्या वतीने दोन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवीन ठाणेगाव येथेही शिव मंदिर परिसरात दोन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च  शुक्रवारला सायंकाळी ५ वाजता घटस्थापना व आरती,‌ रात्री ८ भजन व किर्तन, ९ मार्च शणीवारला सकाळी ७ वाजता ग्राम सफाई व त्यानंतर गावामधुन भव्य शोभायात्रा  त्यानंतर १२ वाजता दिपप्रज्वलन व प्रवचनकार हभप टेकाम महाराज व संच रा. कोहमारा ता अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया यांचा प्रवचन व कीर्तन या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्यानंतर सायंकाळी ४ वाजता गोपाल काला व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी दिपप्रज्वलन म्हणून वासुदेव मंडलवार सरपंच ठाणेगाव, योगेंद्र चापले सेवानिवृत्त नायब तहसीलदार आरमोरी, चंद्रकांत किरमे सेवा निवृत्त नायब तहसीलदार गडचिरोली, भाग्यवान खोब्रागडे किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी, पुरूषोत्तम जुवारे हडडी वैद्य, पुंडलिक जुवारे, गंगाधर कुकडकार,‌ शामराव भुरसे, कृष्णा इन्कने, राकेश जुवारे, सदानंद कुथे सर कर्मविर विद्यालय वासाळा, घनश्याम कुनघाडकर तमुस अध्यक्ष ठाणेगाव, उत्तम पेंदाम पोलिस पाटील ठाणेगाव, शशीकांत मडावी आरोग्य सेवक, रामभाऊ पडोळे, विजय गडपायले ग्राम विकास अधिकारी, कुंभरे मंडळ अधिकारी, संकेत कात्रटवार तलाठी, गिता बरडे मुख्याध्यापिका,  शैलेंद्र गजभिये, अजय नारनवरे, हरिदास मडावी, निता मडावी, स्नेहा भांडेकर, लता जुवारे, वर्षा मडावी, सरिता नैताम, वैष्णवी कत्रे, इ. ठाणेगाव परिसरातील भाविक भक्तांनी या भव्य यात्रेचा लाभ घ्यावा असे ठाणेगाव वासियांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos