महत्वाच्या बातम्या

 २८ डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : युवकांच्या विविध कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा महोत्सव २८ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. या करीता राज्यामध्ये जिल्हास्तर, विभागस्तर व राज्य स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करून राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा संघ निवडण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा १५ वर्ष पुर्ण व २९ वर्षा आतील वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे २८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य व लोकगित या दोन बाबींचा समावेश आहे. लोकनृत्य मध्ये साथसंगतसह जास्तीत जास्त २० कलाकारांचा सहभाग असावा. लोकगित मध्ये साथसंगतसह १० कलाकारांचा समावेश असावा. स्पर्धकांनी आवश्यक वाद्यवृंद व साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. लोकगित व लोकनृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना पुर्वध्वनी मुद्रीत टेप अथवा रेकॉर्डींगवर कार्यक्रम सादर करता येणार नाही. लोकगीत व लोकनृत्य चित्रपटबाहृय असावेत. महोत्सवातील प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना विभागीय महोत्सवाकरीता प्रवेश देण्यात येईल. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवक मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील युवक युवतींनी लोकनृत्य व लोकगीत या बाबीमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपला प्रवेश नोंदवून जिल्हा युवा महोत्सवात सहभाग घ्यावा. आपला प्रवेश २८ डिसेंबर रोजी १ वाजता पर्यंत सहभागी कलाकारांच्या नावासह प्रवेशयादी, मोबाईल नंबर, संस्थेचे नाव व प्रत्येकाच्या जन्मतारखेचा दाखला व रहिवासी पुराव्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा येथे नोंदवावा किंवा sport_wda@yahoo.com या मेलवर नोंदवावा. अधिक माहिती व नियम, अटींकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकूरवाळे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos