महत्वाच्या बातम्या

 राज्यसभेत जय हिंद-वंदे मातरमवर बंदी : सोमवारपासून संसदेचे अधिवेशन


- थँक्यू ही म्हणता येणार नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा सचिवालयाने सदस्यांसाठी कठोर नियमावली जारी केली आहे. यामध्ये राज्यसभा सभागृहात जय हिंद, वंदे मातरम् या शब्दांवर बंदी घातली आहे.

सभागृह सुरू असताना थँक्स, थँक्यूही म्हणता येणार नाही -

अधिवेशनादरम्यान राज्यसभा सदस्यांनी अनावश्यक व वादग्रस्त विषय टाळावेत. आतापर्यंत खासदार विशेषतः विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी देण्यात आलेली नोटीस सार्वजनिक करत आले आहेत. परंतु नव्या नियमावलीनुसार तसे करता येणार नाही. जोपर्यंत सभापती एखाद्या विषयासंदर्भात सदस्याने दिलेली नोटीस मंजूर करत नाहीत आणि सभागृहातील अन्य सदस्यांना त्याबाबत कळवत नाहीत तोपर्यंत ती नोटीस सार्वजनिक करता येणार नसल्याचे राज्यसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.

६० दिवस अनुपस्थित राहिल्यास सदस्याची सभागृहातील जागा जाणार -

राज्यसभेचा कोणताही सदस्य ६० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे. सभागृहात सदस्यांची उपस्थिती नोंदविणे आवश्यक असून सभापती यांनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.





  Print






News - World




Related Photos