३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पहिली फेरी ३  फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे. 
 मोहिम यशस्वी होण्याकरिता तालुका टास्क फोर्स समितीची सभा तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य अधिकारी यांनी आयोजित करावी. सभेमध्ये विविध विभागातील प्रतिनिधीचा सहभाग घेण्यात यावा. मोहिममध्ये विविध स्वयंसेवी संस्था, रोटरी समाजकार्य महाविद्यालय इत्यादीचे सहकार्य घेण्यात यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील जोखमिचे कार्यक्षेत्र शोधुन सदर कार्यक्षेत्रातील लाभार्थी संरक्षीत करण्याच्या  दृष्टीने स्वतंत्र कृती योजना तयार करावी. आपल्या कार्यक्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची नावानिशी यादी तयार करावी.  असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी    यांनी दिले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-08


Related Photos