महत्वाच्या बातम्या

 २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत जिल्हयातील अनाथ बालकांच्या पंधरवाडा दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील अनाथ बालकिांच्या विविध मागण्यासंदर्भात २३ फेब्रुवारी २०२४ ते ५ मार्च २०२४ या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, महाराष्ट्र राज्याचा अधिवास बोनाफाईड व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड इत्यादी उपलब्ध करुन देण्याबाबत संपुर्ण राज्यात पंधरवाडा राबविण्यासंबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, भंडारा या अनाथांच्या मदतीकरीता कक्ष स्थापन करण्यात आले आहे. रती भंडारा जिल्ह्यातील अनाथांनी कक्षास भेट देऊन आवश्यक ते प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos