आज नामांकनाची पाटी कोरीच, तिसऱ्या दिवशी तिनही विधानसभा क्षेत्रात ४५ नामांकनांची विक्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा निवडणूकीसाठी २७ सप्टेंबरपासून नामांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.  काल २९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने शासकीय सुट्टी होती. तर आज ३० सप्टेंबर रोजी नामांकन करण्याचा तिसरा दिवस होता. आज तिनही विधानसभा क्षेत्रात ४५ नामांकनांची विक्री झाली. मात्र एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केले नाही. 
आरमोरी विधानसभा क्षेत्रात २३ नामांकन अर्जांची विक्री झाली. यापैकी एकाही उमेदवाराने आज नामांकन दाखल केले नाही. या विधानसभा क्षेत्रात पहिल्या दिवशी एक नामांकन दाखल झाले आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आज २० नामांकनांची विक्री झाली. यापैकी एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केले नाही. आतापर्यंत या विधानसभा क्षेत्रात एकही नामांकन झालेले नाही. 
अहेरी विधानसभा क्षेत्रात २ नामांकनांची विक्री झाली आहे. एकाही उमेदवाराने आज नामांकन भरले नाही. या विधानसभा क्षेत्रात पहिल्या दिवशी एका उमेदवाराने नामांकन दाखल केले आहे. ४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहिर झालेले नाहीत. यामुळे शेवटच्या दिवशी नामांकनांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-30


Related Photos