महत्वाच्या बातम्या

 दिलखुलास कार्यक्रमात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे यांची उद्या मुलाखत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात २४ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, सुरेंद्र तावडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व  केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून शुक्रवार २३ व शनिवार २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सातत्याने काळजी घेण्यात येत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक संरक्षण कायदाही लागू करण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण कायदा, त्याअंतर्गत ग्राहकांना कोणते अधिकार व संरक्षण देण्यात येते, ग्राहकांची फसवणूक झाल्यास दाद कुठे व कशी मागायची अशा विविध विषयांची विस्तृत माहिती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, तावडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

  Print


News - Rajy
Related Photos