कोठी - अहेरी बस पलटली, चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित होता बस, ११ प्रवासी किरकोळ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनीष येमूलवार  / भामरागड :
तालुक्यातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशाच रस्त्यामुळे कोठी - अहेरी बस पलटली असून या अपघातात ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही बस चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. 
एमएच ०६ एस ८८३५ क्रमांकाची अहेरी आगाराची बस अहेरी येथून कोठी येथे काल ८ सप्टेंबर रोजी पोहचली. रात्री मुक्कामी राहिल्यानंतर बस प्रवासी घेवून आज ९  सप्टेंबर रोजी सकाळी निघाली. दरम्यान कारमपल्ली वळणाजवळ बस आल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली. या ठिकाणी रस्ता वाहून गेला होता. रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला. माती टाकण्यात आली मात्र दाबण्यात आली नाही. यामुळे बसची चाके रूतली आणि बस एका बाजूला होत पलटली. यामुळे या अपघाताला कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि चालक व वाहक कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-09


Related Photos