हिक्केर जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृतकांचा शोध मोहीम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मौजा-हिक्केर जंगल परिसरात, पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) ता. एटापल्ली जिल्हा गडचिरोली जंगल परिसरात १ एप्रिल २०२३ रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना हिक्केर जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात एक पुरुषाचा मृतदेह सापडल्याने सदर मृत्यूचे कारण तपास करणेकामी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, सुरु केली असून सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये चौकशी करावयाची आहे.
सदर घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी, प्रत्यक्षदर्शी चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांचे समक्ष जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एटापल्ली कळविले आहे.
माहितीनुसार पाहिल्याप्रमाणे घटनेचे वर्णन, आपण आपला या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्याविषयी आपले म्हणणे व या घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती याप्रकारे सादर करायची आहे.
News - Gadchiroli