श्रमसंस्कार व ग्रामीण शिबीरात किशोरवयीन मुलींकरिता मार्गदर्शन तथा कर्करोग तपासणी संपन्न


- फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली रा.से. यो. विशेष उपक्रम
- मुखाचा, स्तनाचा, गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली सत्र २०२२-२०२३ चे विशेष श्रमसंस्कार व ग्रामीण शिबीर ०६ फेब्रुवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मौजा जांभळी या गावात आयोजित करण्यात आले.
१० फेब्रुवारी २०२३ रोजी किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन तथा मुखाचा, स्तनाचा, गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उद्घाटक म्हणून डॉ. सुबिता पाटील असोसिएट प्रोफेसर आणि फिजिशियन टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई आणि विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रेरणा राऊत मेडिकल ऑफिसर तथा प्रकल्प व्यवस्थापक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली या उपस्थित होते. किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. आविष्कार भांडेकर, समुदाय आरोग्य आधिकरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिपक तायडे हे असून कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पेरासापेन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दाजगाये, प्रा. सरिता बुटले, शिबीर समन्वयक आणि मिलिंद भैसारे कैवल्या एज्युकेशन फाउंडेशन गांधी फेलो हे उपस्थित होते.
या शिबिरात मोठ्या संख्येने पेरसापेन हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता तर कर्करोग तपासणी शिबिरात ३० नागरिकांनी मुखाचा, स्तनाचा, गर्भाशय मुख करकरोग तपासणी केले. हे शिबीर आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तथा टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हितेश चरडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण टेकाम या शिबिरार्थीने केले असून आभार प्रदर्शन चिराग पोरेड्डीवार याने केले.
ग्रामस्थांचा या शिबिराला भरभरून प्रतिसाद लाभला. असून या शिबिरासाठी कर्करोग प्रशिक्षण, तपासणी आणि नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घतले. या सर्व कर्करोग तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांनी नागरिकांना बोलावणे, नाव नोंदणी करणे, त्यांना तपासणी कक्षा पर्यंत पोहोचवणे यासाठी परिश्रम घेतले.
News - Gadchiroli