अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघाती स्फोटात ४० जणांचा मृत्यू


वृत्तसंस्था / काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री एका लग्नसमारंभात  झालेल्या आत्मघाती स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.   या स्‍फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.  काबूलमधील स्थानिक मीडियानं गृह मंत्रालयाच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार रात्री ११.४० वाजता) हा बॉम्बस्फोट झाला. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे अशी माहिती अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.  

   Print


News - World | Posted : 2019-08-18


Related Photos