कोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू


- १५ ते १६ च्या संख्येत होते दरोडेखोर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  शिर्डी : 
अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी ता.कोपरगांव  येथे मुख्य रस्त्यावर  दरोडेखोरांनी लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर काल १९ ऑगस्ट रोजी  सायंकाळी ७ ते ७.३० वा  धाडसी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (संगमनेकर)  (३६)हे ठार झाले तर गणेश सुभाष घाडगे (४२) हे जखमी झाले. जखमीवर कोपरगांव येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी  नाशिक येथे हलविण्यात आले आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,कोळपेवाडीतील मुख्य रस्त्यावर असलेले लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे शेजारील छोट्या दुकानात सर्व माल हलविण्यात आला होता. यातील लाखो रुपयांच्या सोने- चांदीचा ऐवज १५ ते१६ दरोडेखोरांनी हात बाॅम्बचा वापर करुन. दरोडा टाकुन लुटून नेला. दरोडेखोरांनी दुकानात घुसल्यावर गोळीबार केला.यात शाम यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला,तर गणेश यांच्या पोटात एक गोळी लागली व एक हाताला चाटून गेली.त्यांचे वडील सुभाष यांच्या डोक्याला दरोडेखोरांनी पिस्तुल लावले व सर्व माल लुटून नेला. काल कोळपेवाडीचा आठवडे बाजार होता.त्यामुळे गावात मोठी गर्दी होती.सायंकाळची वेळ असल्यामुळे दुकानदार दुकानांची आवरासावर करत होते.याच परिस्थितीचा दरोडेखोरांनी फायदा घेत.त्यांनी जाताना  लोकांच्या दिशेने दगड फेकले. त्यामुळे लोक बाजुला झाले.संधी साधत दरोडेखोर पळून गेले.कोळपेवाडी परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-08-20


Related Photos