भरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ :
रस्त्याने शेळ्यांचा कळप जात असतांना शेळ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोरिक्षा चालकाने बाजूने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना यवतमाळमधील लाडखेडजवळ आज ८ सप्टेंबर  रोजी  सकाळी ८  वाजता  घडली. 
पुणे येथून येणारी ट्रॅव्हल्स भरधावे वेगाने प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जात होती. याचवेळी दारव्हा तालुक्यातील बानायत येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा बानायत येथून लाडखेडला जात होती. त्याचदरम्यान लाडखेड येथील बसस्थानकाजवळील पुलाजवळ ट्रॅव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षातील १३ विद्यार्थी आणि चालक असे १४ जण जखमी झाले. त्यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहे.
अपघातातील जखमींना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑटोरिक्षा चालक सुभाष ठाकरे (३८) जखमी असून त्यांचा मुलगा पूर्वेश सुभाष ठाकरे व धम्मा शिरसाट हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.  घटनास्थळी लाडखेडचे ठाणेदार सारंग मिराशी यांच्यासह पोलीस ताफा दाखल झाला. त्यांनी जखमींना उपचारार्थ हलविण्यास मदत केली.  Print


News - Rajy | Posted : 2018-09-08


Related Photos