महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर महानगरपालिका आयोजित राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव संपन्न


- काय ती भिंतीचित्रे, काय तो प्रतिसाद, एकदम जबरदस्त 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सतत नवीन उमेद, नवीन प्रयोग, नवीन स्पर्धा, काही नवीन करायची इच्छा असणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या अथक प्रयत्नांनी  भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव केवळ यशस्वीच झाला नाही तर आयोजन करणारे आयोजक असेच असावे, अशी इच्छा स्पर्धकांनी व्यक्त केली.
चंद्रपूर महानगरपालिका आयोजित राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव २३ ते २६ डिसेंबर या काळात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, अमरावती, वर्धा इत्यादी विविध शहरातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. दिव्यांग स्पर्धकांचा उत्साह यात प्रकर्षाने पाहावयास मिळाला. चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग, वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात आल्या.
शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, पर्यावरण संरक्षण, स्वच्छतापर संदेश, प्लास्टीक बंदी चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव, रेन वॉटर हार्वेस्टींग अशा विविध १४ विषयाचे चित्रण जे चित्रकारांनी केले त्याचे कौतुक नागरिकांद्वारे केले जाते आहे. संताजी सभागृहात सर्व कलाकरांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
कलाकार कलेसाठी समर्पित असतात, त्यामुळे ते सकाळी ६ वाजेपासुनच कामाला सुरवात करतात तेव्हा त्यांना लवकर चहा, पाणी, नाश्ता, जेवणाची सोय करण्यास आयुक्तांनी जबाबदारी वाटून दिली होती. स्पर्धा मोठ्या प्रमाणात असल्याने मनपाचे सर्वच अधिकारी किंवा कर्मचारी व्यवस्थेत होते. सर्व कलाकारांच्या कलेची ड्रोन द्वारे चित्रीकरण करण्यात आले. स्पर्धेत भाग घेणारे सर्वच कलाकार हे पारंगत होते. केवळ भिंतीच नाहीत तर वृक्षांवर सुद्धा कलात्मक व सामाजीक संदेश देण्यात आले आहेत.
भिंतीचित्र पेंटींग स्पर्धेत चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट असल्याने समुह गटात प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये असुन द्वितीय १ लक्ष तर तृतीय बक्षीस ५१ हजार रुपये दिले जाणार आहे. तर वैयक्तीक गटातील स्पर्धकास प्रथम बक्षीस ७१ हजार रुपये असुन द्वितीय ५१ हजार तृतीय बक्षीस ३१ हजार रुपये तसेच प्रत्येकी १० प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत.
त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. यात अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. लवकरच मनपाद्वारे बक्षीस वाटपाचा कार्यक्रम घोषीत करून स्पर्धकांना कळविले जाणार आहे.
स्पर्धेचे आयोजन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नियंत्रणात उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, विधी अधिकारी अनिल घुले, डॉ.अमोल शेळके, नागेश नित, विकास दानव, गिरीराज प्रसाद, साक्षी कार्लेकर तसेच इतर सर्व विभागांनी केले.  





  Print






News - Chandrapur




Related Photos