महत्वाच्या बातम्या

 फ्रान्स येथील जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे कौशल्य विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा यावर्षी फ्रान्स देशातील ल्योन शहरात होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या ५२ क्षेत्राशी संबंधित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर्स स्किल कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर या स्पर्धेसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था तसेच वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या स्पर्धे संदर्भातील माहिती कौशल्य डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक दोन, दुसरा मजला, सिव्हिल लाईन्स या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुनंदा बजाज यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos