इंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटुंबीयांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील  इंदाराम येथील रहिवासी रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. 
 तालुक्यातील इंदाराम या गावचा रहिवासी रविंद्र मामीडालवार हा तेलंगणा राज्यातील मंदामारी या गावात   उदरनिर्वाह करण्याकरीत कुटुंबासह   राहत होता . तो एका मंदीरात पुजारी म्हणून काम करत होता.   याच ठिकाणी त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा  मृत्यू झाला. घटनेची माहिती  जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय  कंकडालवार यांना देण्यात आली. त्यांनी लगेच  मंदामारी या गावाला जावून रविंद्र मामीडालवार यांच्या कुटुंबाला भेट देऊन विचारपूस केली. सांत्वन केले.  
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम ,मामीडालवार  ,सत्यनारायण मामीडालवार, प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, पिंटू मडावी, विलास समुद्रलवार, संतोष राऊत, नारायण राऊत प्रवीण कोरेत  उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-29


Related Photos