महत्वाच्या बातम्या

 रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेणार : राधाकृष्ण विखे पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासंदर्भात जानेवारीत बैठक घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.

सदस्य महेंद्र थोरवे यांनी याबाबत लक्षवेधी सूचनाद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बोलत होते.

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करण्यात आले, मात्र त्याला विरोध झाला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, याबाबत शासन सकारात्मक आहे. यासंदर्भात येत्या जानेवारी महिन्यात स्थानिक आमदार, विभागीय आयुक्त, ठाणे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. तसेच रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात सांगितले.

  Print


News - Nagpur
Related Photos