महत्वाच्या बातम्या

 इंडियाविरुद्ध छुपा अजेंडा : एनसीईआरटी पुस्तकांत भारत 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा धसका भाजप आणि मोदी सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नॅशनल कान्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटी च्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये आता इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली आणि इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडिया आघाडीला देशभरात जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. यामुळे हादरलेले मोदी सरकार इंडिया ऐवजी भारत असा बदल करण्याचा छुपा अजेंडा राबवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. एनसीआरटी पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत छापण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला एनसीआरटीच्या पॅनेलने मंजुरी दिली आहे.

एनसीईआरटीने वर्ष २०२१ मध्ये विविध विषयांवर पोझिशन पेपर्स सादर करण्यासाठी एकूण २५ समित्या नेमल्या होत्या. त्यांपैकी एक असलेल्या सामाजिक शास्त्रांसाठीच्या समितीने अभ्यासक्रमातील प्राचीन इतिहास काढून त्याऐवजी शास्त्राrय इतिहासाचा समावेश करण्यासही सुचविले असल्याचे समिती अध्यक्ष सीआय इस्साक यांनी सांगितले. तसेच वैज्ञानिक प्रगतीबाबत हिंदुस्थानला कमी लेखणाऱया ब्रिटिशांच्या इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास, अशी विभागणी केली जाणार आहे.

- केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या वतीने आयोजित केलेल्या जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला होता.

- दिल्लीत पार पडलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरील नेमप्लेटवरही इंडिया ऐवजी भारत असे लिहिण्यात आले होते.





  Print






News - World




Related Photos