भामरागड येथील पुरग्रस्तांशी आ. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी साधला संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड तालुक्याला तब्बल पाचवेळा पुराने वेढले होते. यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या बाबीची दखल घेत आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी भामरागडला भेट देवून पुरग्रस्तांशी संवाद साधला.
आमदार आत्राम यांनी पुरग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या. नागरीकांनी प्रत्यक्ष समस्या मांडल्या. यावेळी तहसीलदार कैलास अंडील तसेच महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-17


Related Photos