गडचिरोली येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ
- खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शासकीय आधारभूत किंमत खरिप हंगाम सन-२०२३ -२४ अंतर्गत भात (धान्य) खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोली या ठिकाणी पार पडला.
या धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त करतांना शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरु केले आहे. या अनुषंगाने ३० नोव्हेंबर २०२३ ला शासकीय आधारभूत किंमत खरिप हंगाम भात (धान्य) खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. यांचा लाभ गडचिरोली परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी उदघाटन समारंभ सोहळा प्रसंगी केले.
यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपा कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, गडचिरोली भाजपा तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, संचालक जि.म. बँकेचे खेमनाथ पा. डोंगरवार, भाजपा जिल्हा सचिव गणपतराव सौनकुसरे, खरेदी विक्री चे अध्यक्ष व्यंकटजी नागीलवार, डॉ. बळवंतराव लाकडे उपसभापती, तालुका महामंत्री बंडु झाडे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
News - Gadchiroli