मुंबई विमानतळावर सोने तस्करीची नवीन पद्धत आली समोर


- सोन्याच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : दुबई येथून आलेल्या दोन प्रवाशांनी अंतर्वस्त्रामध्ये लपवून आणलेले साडेचार कोटी रुपये मूल्याचे तब्बल ८ किलो सोने पकडण्यात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक
दुबई येथून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे सोने असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. दुबईतून आलेल्या या विमानातून प्रवासी बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी या दोन प्रवाशांची चौकशी केली. मात्र, सुरुवातीला त्यांच्या तपासणीमध्ये काहीच आढळले नाही. मात्र, सखोल तपासणीमध्ये या दोघांनी त्यांच्या अंतर्वस्त्रामध्ये सोन्याची पेस्ट केलेली पाकिटे लपविल्याचे आढळून आले.
दरम्यान, सोने तस्करीची ही नवीनच पद्धती समोर आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपास करत आहेत.
News - Rajy | Posted : 2023-01-18