आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण, आदिवासी समाजातील नागरिकांचा ग्रामीण रुग्णालय , आश्रमशाळेला घेराव


-  संस्था चालक व मुख्यध्यापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 
- मृतक विद्यार्थी भामरागड तालुक्यातील 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली  येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा काल २४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूला  संस्था चालक , मुख्यध्यापक व अधीक्षक जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अधीक्षकाला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी समाजातील नागरिकांनी आश्रमशाळेला घेराव घातला होता. 
भीमराव लालसू गावडे (८) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून   तो  मूळचा भामरागड़ तालुक्यातील कोठी  येथील रहिवासी होता. भीमराव  हा श्रीराम आश्रम शाळा, गोजोली येथे शिकत होता. त्याच्या मृत्यू  प्रकारणामुळे परिसरातील आदिवासी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. म्हणून कालपासून आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी शाळेला घेराव घातला होता. गेल्या दहा दिवसांपासून भीमराव लालसू गावडे हा विद्यार्थी आजारी होता. त्याच्यावर शाळेच्या शिक्षकांनी थातुरमातुर उपचार करून परत शाळेत नेले होते. डॉक्टरांनी रक्त तपासायला संगीतल्यावरही शिक्षकांनी तसे न करता परत शाळेत नेले होते. काल अचानक विद्यार्थ्याला चक्कर आली.  तो ख़ाली पडला आणि त्याचा मृत्यु झाला. या प्रकारणामुळे गोंडपिपरी परिसरातील आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शाळेला घेराव केला. आज चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती, कोरपना, गोंडपिपरी परिसरातील शेकडो आदिवासी समाजाचे कार्यकर्ते गोंडपिपरी येथे जमा झाले होते. काल शालेय व्यावस्थापनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने भीमराव गावडे याचे शव ग्रामीण रुग्णालय  गोंडपिपरी येथे शवविच्छेदनसाठी घेऊन गेले होते. पण कार्यकर्त्यांनी संस्था चलकांवर व मुख्यध्यापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी मागणी केली होती. म्हणून काल शवविछेदन केले नाही. आज मृत विद्यार्थ्याच्या पलकांसोबत शेकडो कार्यकर्ते ग्रामिण रुग्णालय गोंडपिपरी येथे जमा झाले. त्यांनी मृत विद्यार्थ्याचा पलकांसोबत चर्चा करून मागण्या व अटी प्रशासनासमोर मांडल्या .  संस्था चालक व मुख्यध्यापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,  श्रीराम आश्रम शाळेच्या अधिक्षकाला त्वरित निलंबित करण्यात यावे,  संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी,  मृत विद्यार्थ्याच्या पलकांना नुकसान भरपाई देण्यात यावी,  सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी,  प्रत्येक आश्रम शाळेत एम. बी. बी.एस. डॉक्टरच्या निगरानीख़ाली एक मेडिकल यूनिट तयार करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. 
वागण्याचे   निवेदन प्रकल्प अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आले . चर्चेनन्तर  संस्था चालकाने ४ लाख रुपये मृत विद्यार्थाच्या पलकांना देण्यास तयार झाला  व आदिवासी विकास विभागाने १ लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले. पोलिस प्रशासनाने शवविछेदन झाल्यावर दोषींवर कड़क करवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ पत्र काढून शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून शाळेची मान्यता रद्द करण्याचेही आश्वासन दिले. यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात प्रामुख्याने  जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी,  जिल्हा परिषद सदस्य गोधरु पाटील जुमनाके, प्रामोद बोरीकर, आश्विन कुलसंगे, साईनाथ कोडापे, दयालाल कन्नाके, गीतेश कुड़मेथे, कमलेश आत्रम, मनोज आत्रम इ. सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-25


Related Photos