महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२३ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१७०७ : ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

१८५० : अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

१८९० : हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

१९४४ : दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१९७३ : संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९९७ : सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

२३ ऑक्टोबर जन्म

१७७८ : कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

१८७९ : वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)

१९०० : इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)

१९२३ : श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

१९२३ : भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)

१९२४ : संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९)

१९३७ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

१९४० : ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

१९४५ : अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९९६)

१९७४ : भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.

२३ ऑक्टोबर मृत्यू

१९१० : थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

१९१५ : इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

१९२१ : चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९५७ : ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

२०१२ : बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos