महत्वाच्या बातम्या

 लोकसंख्येचा स्फोट : हिंदुस्थानची लोकसंख्या १४२ कोटी, चीनला टाकले मागे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान जगात भारी ठरला असून, चीनला मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश हिंदुस्थान आहे.

हिंदुस्थानची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख तर चीनची १४२ कोटी ५७ लाख आहे. दरम्यान, जगाची लोकसंख्या ८०० कोटी आहे म्हणजे जगात प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक हिंदुस्थानी आहे.

२०२३ मध्ये हिंदुस्थान सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल, असे भाकीत यूएनएफपीएने यापूर्वीच वर्तविले होते, ते आता खरे ठरले आहे. चीनच्या तुलनेत हिंदुस्थानात लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. एका वर्षात १.५६ टक्क्यांनी लोकसंख्या वाढली आहे.

हिंदुस्थानची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख तर चीनची १४२ कोटी ५७ लाख आहे. चीनपेक्षा हिंदुस्थानची लोकसंख्या २९ लाखांनी जास्त आहे. चीनच्या लोकसंख्येत पहिल्यांदाच घट दिसून आली. तेथे जन्मदर एवढा कमी झाला की तो मायनसमध्ये नोंदविला गेला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos