महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या वस्तूंचे थेट चीनशी कनेक्शन : तपासादरम्यान झाला उलगडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्षभरापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या वस्तू नेमक्या काय आहेत याचा उलगडा झाला आहे. या वस्तूंचे थेट चीनशी कनेक्शन उघड झाले आहे.

या वस्तु म्हणजे चीन देशाच्या लॉंग मार्च या उपग्रहाचे तुकडे असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच एप्रिल 2022 मध्ये सिंदेवाही व चिमुर तालुक्यांमध्ये आकाशातून काही वस्तू पडल्या होत्या. त्यातील एक रिंग सदृश्य वस्तू होती तर सुमारे 6 हे गोलाकार सिलेंडरच्या स्वरूपातील भाग होते. या वस्तू आकाशातून पडल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते.

यासंबंधी तपासणी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे पथक दाखल झाले होते. बरोबर वर्षभरानंतर अवकाशातून पडलेले हे तुकडे चीन देशातील लॉंग मार्च या उपग्रहाचे काही भाग असल्याची पुष्टी इस्रो ने केली आहे. या संदर्भात चंद्रपूरचे खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांशी सतत संवाद ठेवला होता. यानंतर तपासादरम्यान ही बाब उघड झाली आहे.


वर्षभरापूर्वी नेमके काय घडल होत?

आकाशात आधी आगीचे लोळ दिसले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात त्याचे अवशेष आढळले होते. सिंदेवाही तालुक्यात पवनपार येथे साडेपाच किलोचे गोल आकाराचे अवशेष आढळले होते. हे अवजड धातूचे गोळे आकाशातून पडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. अनेक ग्रामस्थांनी हे गोळे हातात घेऊन फोटोही काढले होते. सिंदेवाही तालुक्यात लाडबोरीमध्ये एक भलीमोठी रिंग आढळली होती. मोठा आवाज करत ही रिंगसदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. स्थानिकांनी ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये नेली. ही रिंग अत्यंत जड होती. मिश्र धातूंनी बनलेली ही अवजड रिंग नक्की कशाचा भाग होता हे स्पष्ट झाले नव्हते. प्रशासनाने अंतराळ संशोधन संस्थेकडे हे नमुने तपासासाठी पाठवले होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos