महत्वाच्या बातम्या

 शिवजयंती निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विकृतीशास्त्र व नर्सिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व श्रमदान शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ, महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून रक्तपेढी 28, दत्तनगर 30, गडचांदूर 44 व चिंतलधाबा 30 असे एकूण 134 बॅग रक्त संकलन करण्यात आले. एकाच वेळी तीन रुग्णांना रक्त देण्याकरिता सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने सदर रक्त संकलन हे ट्रिपल बॅगमध्ये करण्यात आले.

त्यासोबतच, अपघात विभाग, रुग्णालयातील रिकामा परिसर, वार्ड तसेच रुग्णालयाचा कॉरिडोर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. श्रमदानामध्ये अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, परिसेविका अल्का बावनकर, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलेश चांदेकर, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र जांभुळकर, रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. भूषण नैताम, कार्यालयीन अधीक्षक चतुरदास पाटील, राहुल येरेवार, विशाल बिराजदार, संतोष गोरेवार, निखिल वाडीकर, सुनील वाडकर, राज शेंद्रे, किशोर भांगे, कुडगारकर आदींचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.

तत्पूर्वी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos