महत्वाच्या बातम्या

 मेरी माटी मेरा देश उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप दया : मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा


- जिल्ह्यामध्ये उपक्रमाच्या पूर्वतयारी तयारीचा घेतला आढावा. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरूप देऊन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी ३१ जुलै रोजी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बचत भवन येथे आयोजित बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या उपक्रमाच्या संदर्भात चर्चा केली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मेरी माटी मेरा देश, हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये शहरी भागात नागपूर महानगरपालिका, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सौम्य शर्मा यांनी सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर विभागीय वन अधिकारी हरविर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा या प्रकल्पाच्या नोडल अधिकारी राजनंदिनी भागवत होत्या.

तसेच या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात गठीत समितीचे सदस्य उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत अमृत सरोवर येथे शिलालेख लावणे, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, सेल्फी काढणे, वसुंधरा वंदन करणे, वीरांना वंदन करणे, ध्वजारोहण व राष्ट्रगान गायन करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या विविध भागात सेल्फी पाँईट उभारून पंचप्राण प्रतिज्ञा घेताना नागरिकांना आपल्या हातात मातीचा दिवा घेऊन प्रतिज्ञा घ्यायची आहे. सेल्फी पाँईट उभारून पंचप्राण प्रतिज्ञा घेताना नागरिकांना आपल्या हातात मातीचा दिवा घेऊन प्रतिज्ञा घ्यायची आहे. शाळा, महाविद्यालये विविध ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्याचे आहे, या सर्व कामांना शासकीय काम न समजता एका उपक्रमाचे स्वरूप द्यावे, असे आवाहनही यावेळी सोमेश्वर यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos