महत्वाच्या बातम्या

 शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महिलांसाठी विशेष ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / भंडारा : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे २२ जून २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, बस स्टँड जवळ, भंडारा येथे  महिलांसाठी विशेष ऑफलाइन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मेळाव्याच्या अनूषंगाने नियोक्त्यांनी त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील त्यांच्या लॉगीनमधून शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी विशेष प्लेसमेंट ड्राईव्ह-३ (ऑफलाईन) येथे अधिसुचित करावी. तसेच नोकरी इच्छुक महिलांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा.

मेळावा हा केवळ महिलांकरीता आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक इच्छुक व गरजू महिलांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०७१८४-२५२ २५० या दुरध्वनी क्रमांकावर किंवा श.क.सय्यद मो.क्र.७६२०३७८९२४ यांच्याशी संपर्क साधावा.

  Print


News - Bhandara
Related Photos