महिलांनी स्वत:तील कलागुणांचा उपयोग करून सामर्थ्यवान बनावे : भाजपा जिल्हा महामंत्री योगीता पिपरे
- भाजपा महिला आघाडीच्या वतीने आयोजित बेटी बचाओ, बेटी पढाओ योजने अंतर्गत घर तिथे रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महिलांनी प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेवुन आवडत्या क्षेत्रात करिअर करावे. जगातील संदर्भ बदलत आहेत, जगाचा अभ्यास करा, संधी शोधा व संधीचे रूपांतर सोन्यात करा. महिलांनी स्वत:तील कलागुणांचा, ज्ञानांचा उपयोग करून सामर्थ्यवान बनावे, असे प्रतिपादन योगीता पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या माध्यमातून घर तिथे रोंगोळी स्पर्धेचे आयोजन गीता हिंगे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना योगीता पिपरे बोलत होत्या.
याप्रसंगी घर तिथे रांगोळी या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगीता पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, माजी जी.प. सभापती मीना कोडाप, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, माजी नगरसेविका लता लाटकर, माजी नगरसेविका अल्का पोहनकर, पुष्पां करकाडे भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
News - Gadchiroli