जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली प्राणी क्लेष समितीची सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल ९ सप्टेंबर रोजी प्राणी क्लेष समितीची सभा पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह होते.
सभेमध्ये प्राणी क्लेष समितीच्या सहकार्याने निर्देशीत कार्यक्रम, पाणी प्राणी दुकानांची नोंदणी, पाळीव प्राणी, कुत्र्यांचे प्रजनन करून विक्री करणाऱ्या दुकानांची नोंदणी करणे, मोकाट जनावरे, कोंडवाडे, कोंडवाड्यांचे सक्षमीकरण, रस्त्यावर असलेली मटन विक्रीची दुकाने, पशुवधगृह बांधणे, मांस विक्रीची दुकाने बंदिस्त असावी, जनावरांची कत्तल खुल्यावर करणे थांबविणे, अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना पकडून केलेल्या कारवाई, किती आरोपींना अटक केली, किती मुद्देमाल पकडण्यात आला आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
 सभेमध्ये शासन निर्णयानुसार अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सभा सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. वंजारी यांनी सभेला उपस्थितांचे आभार मानले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos