महत्वाच्या बातम्या

 खासदार अशोक नेते यांची मौजा चुरमुरा येथील भागवत सप्ताहाला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मौजा- चुरमुरा येथे श्रीराम नवमी महोत्सव व हनुमान जयंतीच्या निमित्याने रामायण व श्रीमद् भागवत‌ गीता ज्ञानयज्ञ भागवत सप्ताह मोठया आनंद उत्साहाने गावातील नागरिक एकत्रित येऊन भक्ती भावनेने पुजा अर्चा करत भागवत कथा प्रवचनकार ह.भ.प. माधुरी बालपांडे यांच्या संपूर्ण संगीतमय संचासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या भागवत सप्ताह कथेच्या निमित्याने खासदार अशोक नेते यांचे गावातील नागरिक शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या‌ भागवत सप्ताह कथेच्या धार्मिक कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट देत दर्शन घेऊन अशा धार्मिक कार्यक्रमाची आज गरज असून अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले पाहीजे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मन शुद्ध स्वच्छ व निर्मळ ठेवावे. यातून चांगले विचार, चांगले आचार आत्मसात करून  फलित करावे. या भागवत सप्ताहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी खासदार अशोक नेते ‌यांनी केले.

यावेळी माजी सरपंच मुखरु पा. देशमुख, माजी सरपंच बोबाटे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ पा. सोनटक्के, माजी उपसरपंच धुरंधर सातपुते, कवडु पा. म्हस्के, विजय शेंडे तसेच मोठ्या संख्येने गावातील भाविक भक्त उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी चुरमुरा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शेंडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळा प्रसंगी सदिच्छा भेट देत नववधुवरांस शुभाशीर्वाद दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos