महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी


- शेतकार्यांची शासनाला निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : ग्रामपंचायत गुमलकोंडा रै. अंतर्गत येत मागील वर्षे आलेल्या परिस्थितीमुळे मोमनूर जुने आणि गुमलकोंडा रै. येथील चार लोक मुर्त्यूमुखी पडले. त्यांच्या कुटुंबियांना आज पर्यंत शाशनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नाही. तसेच या वर्षी सुद्धा मोट्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने योग्य उपाययोजना तात्काळ करावे, अन्यथा शासन जवाबदार राहील. 

सद्याचा पूर परिस्थितीमुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यात भात व  कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

गडचिरोली जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोमनूर कडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत मोट्या प्रमाणात वाईट अवस्था झाली आहे. याच रस्त्याला मुत्तापूर नालाही अगदी कमी उंचीचा पूल असून ते सुद्धा मोडल्यास आले आहे. त्यामुळे येथील ये जा करणाऱ्या लोकांना डेंजर झोन ठरले आहे. तरी त्वरित मुत्तापूर नाल्यावर उंच पूल मंजूर करावे.  गोदावरी नदी वर बांधलेल्या मेडीगट्टा धरणामुळे धरणाखालच्या शेतजमिनी वाहत जात असल्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. 

वरील सर्व विषयावर ग्रामपंचायत सरपंच यांनी मुख्यामंत्री सोबत मुंबई येथे जाऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. तरी याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos