महत्वाच्या बातम्या

  गडबोरी येथे केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलनाचा समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येणाऱ्या गडबोरी उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२२ पर्यंत ३ दिवसीय केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलन पार पडले. या केंद्रस्तरीय स्पर्धेत देवाडा, टेकरी, मिनघरी, वाकल, वानेरी, उटीमाल, लाडबोरी, उमरवाही, गडबोरी अशा एकुन १० शाळेंनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ २१ डिसेंबरला १० वाजता पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक अक्षय सुक्रे गटविकास अधिकारी सिंदेवाही तर अध्यक्ष शिला उपरकार सरपंच गडबोरी या होत्या. विशेष अतिथी म्हणुन शिल्पा रणदिवे अध्यक्ष शा. व समिती, किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी सिंदेवाही व प्रणिता रणदिवे माजी सभापती पं. स. सिंदेवाही व तेल्कापल्लीवार केंद्रप्रमुख हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन जगदिश बनकर, दिनेश पातरे, पुंडलिक पातरे, अमोल ठवरे, विलास शेंडे, आदेश कोराम, प्रशांत मेश्राम, अतुल मेश्राम ग्रामसेवक गडबोरी, युवराज सुरणकर, कमलाकर जवळे, मनोहर श्रीरामे, नामदेव काटेकर, सुभाष शेंद्रे, भगवान पातरे, दत्तात्रय कारडवार, इंद्रायणी बडगये, नरेंद्र वसाके उपस्थित होते.

दुपारी २ ते ३ दरम्यान केंद्रातील विद्यार्थी व शिक्षकांना ग्रामवासीय गडबोरी तर्फे स्नेहभोजन देण्यात आले. ३ ते ५ वाजता सांघीक क्रीडा स्पर्धा माध्यमिक व प्राथमिक विभागाचे घेण्यात आले. यात खो-खो व कबड्डी खेळ समाविष्ट होता. २२ डिसेंबरला दुपारी ३ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक शितल उपरकार सरपंच गडबोरी, अध्यक्ष शिल्पा रणदिवे, प्रमुख अतिथी म्हणुन समिक्षा वसाके, पोर्णिमा मोहुर्ले, सुषमा मेश्राम, वंदना बनकर, विद्या गुरनुले, अर्चना मेश्राम, पोर्णिमा रामटेके, योगेश खडसिंगे, गोपाल ठाकरे, अचित्र नेवारे, शरद मंचलवार, मंगला रामटेके, राधा नेवारे, अरुणा निनावे हे उपस्थित होते.

२३ डिसेंबरला पुन्हा वैयक्तिक क्रीडा स्पर्धा, अंतीम सांघीक क्रीडा स्पर्धा व भोजन विश्रांती घेण्यात आले. दुपारी ३ वाजता बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. यात बक्षीस वितरक संजय पालवे गटशिक्षणाधिकारी पं.स. सिंदेवाही, अध्यक्ष शितल उपकार सरपंच गडबोरी व प्रमुख अतिथी म्हणुन किशोर पिसे, शिल्पा रणदिवे, जगदिश बनकर, अमोल ठवरे, भगवान माकोडे, दिनकर कोहळे, चंदु रामटेके, कमलाकर जवळे, चंद्रशेखर कंदाळवार, अरुण पेंचलवार, जयंत रामटेके, भाष्कर शेंडे हे उपस्थित होते. यात खो खो या खेळात मिनघरी व कबड्डी या खेळात वाकल या गावाने बाजी मारले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात गडबोरी या गावाने मान कायम ठेवला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संतोष कुंटावार, शिल्पा रणदिवे, अमोल ठवरे, नितीन धात्रक, संजय राठोड, घनश्याम मांदाडे, नेताजी सोयाम, दिनेश टिपले, राजेश निनावे, सुनिल घरत, रमेश जांभुळकर, कालिदास बन्सोड व केंद्रस्तरीय कार्यकारी मंडळ तथा शिक्षक वृंद केंद्र गडबोरी यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos