महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलाने राज्यात बाजी मारली. शेतकऱ्याचा मुलगा राज्यात प्रथम आला. विनायक नंदकुमार पाटील यांनी ६२२ गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर राज्यातून पहिला आला आहे. राज्यात धनंजय बांगर (६०८) हा दुसरा आला. तर सौरभ गावंदे (६०८) याने तिसरा क्रमांक मिळवला. गणेश दत्तात्रय दिघे (६०५) चौथा तर शुभम गणपती पाटील (६०३) आला.

मुलाखतीनंतर काही तासांत निकाल : 
राज्य मुख्य परीक्षा २०२२ च्या निकालात यंदा कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक पाटील यांनी ६२२ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील ६२३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. १८ जानेवारी २०२३ गुरुवारी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला. या मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शेतकऱ्याच्या मुलाचे यश : 
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला ६२२ गुण मिळाले तर धनंजय पाटील ६०८ गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला ५७० गुण मिळाले. विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्रसन महाविद्यालयात झाले. संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या गावात जल्लोष करण्यात आला.

आता होणार पसंतीक्रमाची प्रक्रिया : 
एमपीएससी परीक्षेचा निकाल आल्यानंतर आता पसंतीक्रमाची प्रक्रिया सुरु होणार आहे. २२ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल.





  Print






News - Rajy




Related Photos