२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्तीतून निवडणूक आयोगाला मिळाले १४.५ कोटी


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीत   राजकीय समीकरणांमुळे आणि मतविभाजनामुळे काही उमेदवारांसमोर डिपॉजिट जप्त होण्याचे संकटही आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जप्त झालेल्या डिपॉजिटमधून निवडणूक आयोगाला १४.५ कोटी रुपये मिळाले होते. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला वय आणि निवासाचा पुरावा देण्यासोबतच डिपॉजिटही भरावे लागते. निवडणुकीत वैध मतांपैकी सहा टक्के मते मिळवणे आवश्यक असते. ती मते मिळाली नाही तर उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करण्यात येते. २०१४ च्या निडणुकीत जप्त झालेल्या डिपॉजिटमध्ये बसपा उमेदवारांची संख्या जास्त होती. या निवडणुकीत एकूण ८४.९  टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते.
२०१४ च्या निवडणुकीत १० पैकी ८ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. या निवडणुकीत ८४.९ टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. तसेच जप्त झालेल्या डिपॉजिटमध्ये एससी उमेदवार सर्वाधीक होते. ९०.५ टक्के एससी उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. त्यानंतर खुल्या वर्गातील ८३.३ टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. तर ८०.५  टक्के एसटी उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. तर लोकसभेच्या ६ मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. विशेष म्हणजे दुसऱ्या स्थानावर असूनही त्यांना एकूण मतांच्या सहा टक्के मतेही मिळाली नव्हती. त्यात गाझियाबादमधील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांचा समावेश होता.

२०१४ च्या निवडणुकीत बसपाच्या ८९.१, काँग्रेसच्या ३८.४, तृणूमल काँग्रेसच्या ६७.२ भाजपच्या १४.५,  सीपीआयच्या ८५.१, सीपीएमच्या ५३.८ राष्ट्रवादीच्या ३६.१ टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. तर ३ हजार २१८ अपक्ष उमेदवारांचे जिपॉजिट जप्त झाले होते. त्यांचे जप्त झालेले डिपॉजिट सुमारे ६.७ कोटी होते.  Print


News - World | Posted : 2019-04-13


Related Photos