सवर्ण आरक्षणाच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आठवडाभरात होईल कायद्यात रुपांतर


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  सवर्ण आरक्षणाचे विधेयक  लोकसभा, राज्यसभेत  मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्यांच्यावर स्वाक्षरी केली आहे. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे आठवडाभरात कायद्यात रुपांतर होईल.
मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या सवर्ण दुर्बल घटकाला १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक लोकसभेत आणले होते. लोकसभेत हे विधेयक ३२३ मतांनी मंजूर झाले होते तर राज्यसभेत हे विधेयक १६५ मतांनी मंजूर झाले होते. आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर येत्या काही दिवसांत त्याचे रुपांतर कायद्यात होईल. याचा फायदा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना शिक्षणात आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये होणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-01-12


Related Photos