महत्वाच्या बातम्या

 मुलचेरा : नातवाला वाचवितांना आजोबाला कूलरचा शॉक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : मुलचेरा तालुक्याच्या कोलपल्ली येथे सदर घटना घडली. सागर देवराव आत्राम व भाऊराव पत्रुजी सिडाम असे जखमी झालेला नातू व आजोबाचे नाव आहे. 

माहितीनुसार सागर आत्राम हा कूलरजवळ कपडे वाळवायला गेला. कपडे वाळवण्यासाठी टाकत असतांनाच त्याच्या हाताचा स्पर्श कूलरच्या सर्व्हिस वायरला झाला. शॉक लागताच सागर ओरडला, तेव्हा आजोबा भाऊराव यांनी त्याला हातानेच ओढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दोघेही खाली कोसळले. 

दोघांनाही सुरुवातीला लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यानंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos