महत्वाच्या बातम्या

 उमानुर येथे आगामी लोकसभा निवडणुकी बाबत व गावातील समस्या बाबत चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील उमानूर येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उमानूर येथील दौरा करून ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांच्या बाबत चर्चा केली.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या, गली रस्ते, नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता. समस्यांची निराकरण करण्यात येईल, असे अजय कंकडालवार यांनी येथील नागरिकांना सांगितले.

यावेळी माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्षा डॉ. निसार (पप्पू) हकीम, जेष्ठ नेते नामदेव आत्राम, इंदारामचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, ॲड. हनमंतू अकुदरी, देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे, राजाराम ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम, सामजिक कार्यकर्ते नामदेव पेंदाम, उमानुर माजी सरपंच तारक्का आसाम, गोविंदगावचे सरपंच शंकरी पोरतेट, जिमलगट्टा ग्रामपंचायतचे सदस्य वनिता वेलादी, आविस काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्मीनारायण अट्टेला, आविस काँग्रेस कार्यकर्ते शामराव गावडे, चिरंजीव गांधरला, विघ्नेश यादावर, राजू बोरकुट, किशोर सडमेक, जेष्ठ कार्यकर्ते जयराम, सोमेश्वर गेडाम, पोचम संपत, सुधाकर पोरतेट, श्रीनिवास मडावी, रमेश जंगम, विलास सलफला, नारायण गांधारला, शंकर गावडे, अनिल आलामसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos