स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रा सोमवारी गडचिरोली शहरात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
केंद्र शासनाच्या स्टार्ट अप इंडिया अभियानांतर्गत राज्यात सुरु असलेल्या स्टार्ट अप इंडिया महाराष्ट्र यात्रा सोमवारी २२ ऑक्टोंबर रोजी गडचिरोलीत येत आहे.
नवउद्योजक आणि विद्यार्थी यांच्या नव्या संकल्पनांच्या शोध घेण्यासाठी ही यात्रा सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात फिरत असलेली वाहन यात्रा येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात सोमवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ४. ३०  या कालावधीत असेल. ही वाहन यात्रा राज्यातील २३ महत्वाच्या ठिकाणी पोहचत आहे. यात सहभागी होवून विद्यार्थ्यांनी आपल्या नव्या संकल्पनांची व त्यावरील आधारीत नाविन्यपूर्ण उद्योग उपक्रमांची माहिती नोंदवावी असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-20


Related Photos