वासेरा व सिंदेवाही परिसरातील ऑटो व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : बेरोजगारांच्या उत्थानासाठी शासन प्रयत्नशील असुन वासेरा व सिंदेवाही परिसरातील ऑटो व्यावसायिक चांगलेच गोत्यात आले आहेत. शासनाने बस परिवहन महामंडळात महिलांना ५०% सवलत दिल्यामुळे नागरिकांनी ऑटोच्या प्रवासाकडे पाठ फिरविली आहे. एसटीच्या पावलावर पाऊल ठेवुन खाजगी बसेसनी सुध्दा ५०% सवलत महिलांना जाहीर केले आहे. पण ऑटो व्यावसायिक ते पण करु शकत नाही. डिझेलची प्रचंड भाववाढ लक्षात घेता त्यांना ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे वासेरा, शिवणी, गडबोरी, सिंदेवाही येथील ऑटो व्यावसायिक सकाळी घरून निघतात पण दिवसभर तेथील बसस्थानक परिसरात ताटकळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मजुरी मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
या परिसरात बसच्या फेर्या वाढल्या असल्यामुळे विद्यार्थी, महिला, पुरुष बसच्या प्रवासाला पसंती देत आहेत. महिलांसोबत पुरुष पण बसनेच प्रवास करीत आहेत. जेष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास, ६५ वर्षावरील प्रवाशांना अर्धी तिकीट असल्यामुळे ऑटो व्यावसायिकापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही व्यावसायिकांनी ऑटो विकण्याचा प्रयत्न करुन दुसरा व्यवसाय करण्याचे बोलुन दाखवत आहेत. कुणी प्रवासी वाहतूक सोडुन मालवाहतूकीसाठी ऑटोचा वापर करतांना दिसत आहेत.
तरी राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवुन ऑटो व्यावसायिकांच्या हा बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
मुल ते चिमुर हा प्रमुख जिल्हा मार्ग क्र ४४ रस्ता होण्याअगोदर आम्हाला काही प्रमाणात प्रवासी मिळायचे. तसेच कळमगाव येथील उमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु असल्यामुळे सिंदेवाही ते वासेरा मार्गे बससेवा सुरु आहे. त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत. करीता आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंधनाचे दर वाढले असुन आमचे कौटुंबिक प्रपंच धोक्यात आला आहे.
सिंदेवाही बस स्थानकाने ती भिंत बुजविली
सिंदेवाही पासुन नेरी, चिमुर, वासेरा, नवरगाव असे प्रवासी ऑटो सुरु असतात. काही दिवसाअगोदर या बसस्थानकावर डागडुगीचे काम करण्यात आले. यात वाल कंपाऊडचे पण काम करण्यात आले. बसस्थानकातुन बाहेर पडण्यासाठी ऑटो स्टॅंडच्या दिशेने एक लहान गेट होता तो बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवासी या बाजुने येवु शकत नाही. याने देखिल प्रवासी नागरिकांवर प्रभाव पडला आहे. तरी तो गेट पुर्वरत सुरु करण्यात यावा.
News - Chandrapur