महत्वाच्या बातम्या

 महिला कांग्रेसच्या हेल्पलाईन नंबरचे ईल्लुर येथे उद्घाटन


- महिलांना कायदेविषयक तसेच आरोग्यविषयक सल्ला मोफत मिळवण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करा   

- सौ. रुपाली पंदिलवार यांनी केले आवाहन

- भास्कर फरकडे चामोर्शी प्रतिनिधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली (आष्टी ) : अखिल भारतीय महिला कांग्रेसच्या अध्यक्षा नेत्ता डीसुजा, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांच्या सूचनेनुसार २८ सप्टेंबरला महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी हेल्पलाइनचे उद्घाटन काँग्रेसच्या आष्टी- ईल्लुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते ईल्लुर येथे करण्यात आला.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेत्ता डीसूजा यांनी संपूर्ण भारतात महिलांच्या मदतीसाठी १८००२०३०५८९ हा टोल फ्री नंबर जारी

केला आहे. संपूर्ण देशामध्ये महिला कांग्रेसकडून हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महिलांना कायदेविषयक तसेच आरोग्यविषयक सल्ला मोफत मिळण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग होणार आहे. अनेकदा महिलांना कायदेशीर मदत योग्य पद्धतीने मिळते नाही. आरोग्य विषयक माहितीपण योग्य वेळी मिळत नाही. अशा महिलांना आता या क्रमांकावरुन त्यांना भेडसवणाऱ्या समस्या दूर करता येईल. हा केवळ एक नंबर नसून स्त्री सशक्तीकरणासाठी महिला काँग्रेसने उचलले पाऊल आहे. त्यामुळे या टोल फ्री क्रमांकाचा उपयोग अधिकाधिक महिलांनी करावा, असे आवाहन गडचिरोली महिला काँग्रेस अध्यक्षा तथा आष्टी-ईल्लुर क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार  यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रम  ईल्लुर येथे घेण्यात आला यावेळी आष्टी परीसरातील व ईल्लुर येथील कांग्रेस पार्टीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  Print


News - Gadchiroli
Related Photos