महत्वाच्या बातम्या

 जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती करिता अशासकीय सदस्य नियुक्ती बाबत प्रस्ताव मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा :  जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती भंडाराची सभा १० फेब्रुवारी २०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती भंडाराकरिता अशासकीय सदस्य नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित शासन अधिसूचना १४ मार्च २०१७ नुसार अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत. शासनाचे पत्र क्र. पविआ/१०२२/ प्र.क्र.२०५/पदुम-३ १७ फेब्रुवारी २०२३ नुसार जाहिरात प्रसिद्ध करून बायोडेटा सह अर्ज आमंत्रित करण्याचे सूचित आहे. त्यानुसार खालील वर्गवारी नुसार इच्छुकांनी अर्ज करावे.

गौशाळा अध्यक्ष-१ पद, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था सदस्य-२ पद, सर्व साधारण समितीने नाम निर्देशित केलेले व्यक्ती-२ पद, प्राणी कल्याणासाठी काम करणारे कार्यकर्ते -५ ते ६ पद

इच्छूकांनी आपले इच्छा पत्र/अर्ज फोटो, आधार कार्ड, चरित्र प्रमाणपत्र, पोलीस विभागाकडून प्राप्त करून सादर करावे. तसेच आवश्यकतेनुसार अनुषंगिक कागदपत्रे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय बडा बाजार भंडारा येथे सादर करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

  Print


News - Bhandara
Related Photos