महत्वाच्या बातम्या

 दहावी व बारावी परीक्षेसाठी दक्षता पथकाची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा १८ जुलै ते ८ आगस्ट तसेच आय.टी. व जी.के. विषयाची आनलाईन परीक्षा ९ आणि १० आगस्ट तसेच माध्यमक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा १८ जुलै ते १ आगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.   

परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना आळा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची दक्षता पथकात नियुक्त करण्यात आली आहे. या पथकात स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. 

दक्षता पथकामध्ये उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी पुजा पाटील, नायब तहसिलदार सोनाली पुल्लरवार, नायब तहसीलदार अमित निंबाळकर आणि नायब तहसीलदार प्रतिभा लोखंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. नियुक्त दक्षता पथक नागपूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर महत्वाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना भेटी देत गैरप्रकारांना प्रतिबंध घालणार आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos